हाक साधना वाचन संस्कृती केंद्रासाठी ! PDF Print E-mail
 
 'साधना ' चा हीरक महोत्सव संपन्न झाला तेव्हा आम्ही जाहीर केले होते, 'साधना ' च्या अमृत महोत्सवाची पायाभरणी पूर्ण झाली आहे. अमृतमहोत्सवी वाटचालीसाठी 'साधना ' वाचन-संस्कृती केंद्र 'चालू करू शकता, नव्हे करावेच. त्यासाठीची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे.
  • या केंद्राची कल्पना व्यापक आहे. हे वाचन -संस्कृतीची 'साधना 'करणारे केंद्र आहे. 'साधना ' चे वाचक वाढवणे , हा त्याचा एक भाग आहे.
  • दरमहा किमान एकदा एकत्र येण्यासाठी तयार असलेला वाचकप्रेमी,या केंद्राचा सभासद होऊ शकतो. स्वतंत्र वर्गणी नाही. या बैठकीत साहित्यचर्चा अपेक्षित आहे.
  • या केंद्राच्या सर्व सभासदांना पुणे येथील 'साधना मीडिया सेंटर ' च्या भव्य ग्रंथ व सीडी दालनातून, सर्व खरेदीवर ५ ते ३० टक्के एवढी भरघोस सूट देण्यात येईल.
  • आपल्या जिल्ह्यात साहित्यिक क्षेत्रात संवांद व वाडःमयीन उपक्रम चालू रहावेत यासाठी, केंद्राने विविध प्रकारे काम करणे अपेक्षित आहे. त्यांना 'साधना 'ची सर्व प्रकारची मदत राहील.
  • साधना साप्ताहिकाच्या जुन्या वर्गणीदारांचे नुतनीकरण व नवीन वर्गणीदार मिळावे यासाठी केंद्राचे सहकार्य अपेक्षित आहे.
  • वरीलपेक्षा वेगळ्या कल्पनांचेही स्वागत आहे. संघटनात्मक पातळीवर कार्य शक्य नसेल तर व्यक्तिगत पातळीवर जो सहभाग देता येईल, त्याचेही स्वागत आहे. कृपया लिहा.
  • 'साधना ' चे नवे दहा वर्गणीदार एकत्रीत नोंदवणार्‍या व्यक्तीस रु. ३००/-ची पुस्तके भेट पाठविली जातील.

------- संपादक