संजय आवटे यांची मुलाखत किशोर रक्ताटे

खरं सांगायच तर वाईट आणि चांगला असे दोन्ही वर्ग अस्तित्वात असणार हे एक सर्वाधिक जिवंत माध्यम आहे हे नाकारता यायचं नाही. त्याचा वापर कुणी कसा करायचा, हे आपण ठरवायचं आहे. आजची अनेक चांगल्या लोकांना अनेक जण "फॉलो" करतात, ते त्यांना चांगले विचार हवे आहेत म्हणूनच ना? नवा विचार मांडण्याची, त्यावर येऊ शकणाऱ्या प्रतिक्रियांचा अंदाज घेण्याची एक मोठी संधी आज सोशल मीडियाने आपल्यापुढे आणून ठेवली आहे. तिथे संवाद साधण आहे, कॅथार्सिस आहे, टिंगल- टवाळी आहे प्रेम आहे, भावना व्यक्त करणं आहे... आणि नव्या विचारांवर चर्चा घडवणंही आहे... हे भाषाव्यवहाराचं   नवं आणि हक्काचं माध्यम आहे.

अधिक वाचा

काश्मीर : अलक्षित वास्तव हरिहर कुंभोजकर

काश्मीरच्या जनतेवर पाकिस्तानचे प्रेम असते तर त्यांनी आपल्या ताब्यातील काही भाग आपण होऊन चीनला दिला नसता. पाकिस्तानची ही कृती पोर्तुगीज राजाने इंग्लंडच्या राणीला साष्टीचे बेट आंदण देण्याइतकीच वसाहतवादी आहे. आज भारतातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा जास्त मदत केंद्राकडून काश्मीरला मिळते. वसाहतवादी राष्ट्रे असे करत नाहीत. ती वसाहतींचेच आर्थिक शोषण करतात. म्हणजे काश्मीरच्या लोकांवर भारतानेंच प्रेम केले. पाकिस्तानने नाही; आणि द्वादशीवार भारतावरच वसाहतवादाचा आरोप करतात!

अधिक वाचा

कार्यक्रम

  •  
  • बालकुमार दिवाळी अंक व युवा दिवाळी अंक प्रकाशनपूर्व सवलत नोंदणी सुरु झाली ...